ईव्हीएम मतदान घोळाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

सामना ऑनलाईन,मुंबई

ईव्हीएम घोळाचा आरोपांवरून राजकीय वातावरण तापत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राकेश मोहेड असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. महानगरपालिका निवडणूक नव्याने घेण्याची या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे. ९ मार्चला  ही याचिका न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांच्या न्यायपीठासमोर सुनावणीसाठी येणार आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये मतदानात घोळ झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. इव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्याचा मतदारांचा तसेच उमेदवारांचा आरोप आहे. काही ठिकाणी तर उमेदवारांनी स्वत:ला मत देऊनही त्यांना शून्य मत मिळाल्याचं दाखवण्यात आलं आहे. निवडणुकीत सदोष ‘ईव्हीएम’ वापरून मतांची पळवापळवी झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच ही याचिका करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या