अपहरण झालेल्या ७ वर्षांच्या मुलाची सुटका

114351

सामना प्रतिनिधी । पिंपरी

निगडी येथून अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाची निगडी पोलिसांनी सुखरुप सुटका केली. ओम संदीप खरात (रा. साईनिवास हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर ११२, पुर्णानगर, चिंचवड) असे मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या इंडिका मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी ओमचे अपहरण केले होते. निगडी पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत ओमची सुखरूप सुटका केली आणि त्याला त्याच्या पालकांकडे सोपवले.

आपली प्रतिक्रिया द्या