पिंपरी-चिंचवडमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

पिंपरी -चिंचवड शहरातील पिंपळेगुरव भागातील एका आठ महिन्याच्या बाळाचे आणि सांगवीतील दोन अशा तिघांचे शुक्रवारी (दि.1) रात्री उशिरा कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सक्रिय 68 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहरातील आणि महापालिका हद्दीबाहेरील अशा 123 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंच 42 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट शुक्रवारी (दि.1) रात्री उशिरा आले आहेत. त्यामध्ये पिंपळेगुरव परिसरातील एका आठ महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. तर, सांगवीतील दोन पुरुषांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तिघांना कोरोनाची लागण कोणाच्या संपर्कातून झाली हे समजू शकले नाही. ते कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तर, आजपर्यंत शहरातील 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 14 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील 23 दिवसांत 98 नवीन रुग्णांची भर!
10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 123 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 67 रुग्णांवर आणि शहरातील 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या