पत्नी, सासू-सासऱ्यांनी केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू

49

सामना ऑनलाईन। पुणे

पुण्यामध्ये पत्नी, सासू-सासऱ्यांनी केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या पतीला ठिकाण्यावर आणण्यासाठी पत्नी, सासू आणि सासऱ्यांनी मिळून जावयाला मारहाण केली, यात गंभीर जखमी झाल्यानं जावयाचा मृत्यू झाला आहे. पेत्रस जॉन मनतोडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

याप्रकरणी पत्नी क्रिस्टीना पेत्रेस मनतोडे (वय-२८), सासू लुसीया सुर्यकांत बोरडे (वय-५५), सासरा सुर्यकांत संतोष बोरडे (वय – ५८) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पेत्रस मनतोडे रात्री दारू पिऊन घरी आला, त्यावेळी पत्नी क्रिस्टीना आणि सासू-सासऱ्यांना शिवीगाळ केली. दररोज होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीनं पेत्रसच्या डोळ्यात मिरची टाकली आणि डोक्यात दगड घातला. दरम्यान सासू-सासऱ्यांनीही पेत्रसला लोखंडी पान्हा, कपडे धूण्याच्या धोपटण्यानं जबर मारहाण केली. यात पेत्रसचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या