पितृपक्षात करावे हे 10 महादान, कर्ज आणि रोगसमस्या होतील दूर

3782

13 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. हिंदू धर्मात या दिवसात दानधर्म करण्याला विशेष महत्व आहे. यामुळे पितृपक्षात अनेकजण पित्तरांच्या स्मरणार्थ दान धर्म करतात. पण बऱ्याचवेळा नेमक्या कुठल्या गोष्टी दान कराव्यात हेच काहीजणांना माहित नसते. म्हणूनच जाणून घेऊया या दिवसातील 10 महादानांबद्दल.

गोदान-गोदान केल्याने संबंधित मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो. पण जर गोदान करणे लगेच जमणार नसेल तर तसा संकल्प केला तरी चालू शकते.

भूदान- भूदान म्हणजे जमीन दान करणे. पण त्यासाठी जमीन विकत घेणे गरजेचे नाही. तर मातीही तुम्ही दान करू शकता. यामुळे घरात आर्थिक समृद्धी येते.

तीळ दान- यात काळे तीळ दान केले जातात. काळे तिळ भगवान विष्णूला प्रिय असतात.

स्वर्ण दान- स्वर्ण दान केल्याने व्यक्तीची कर्जातून मुक्ती होते. जर सोने दान करणे शक्य नसेल तर धनदान करावे.

अन्नदान- यात तुम्ही कुठलाही खाद्यपदार्थ, कडधान्य, धान्य दान करू शकता.अन्नदान केल्याने पित्तरांच्या आत्म्याला शांती मिळते. ते आशिर्वाद देतात.

वस्त्रदान- शास्त्रात असे म्हटले जाते की पित्तरांनाही बदलणाऱ्या ऋ‌तुमानाची जाणीव होते. यामुळे ते आपल्या वंशजांकडून वस्त्राची अपेक्षा करतात.

चांदी दान- पुराणामध्ये पित्तरांचा वास हा चंद्रावर असल्याचे लिहले आहे. यामुळे त्यांना चांदीच्या वस्तू अधिक प्रिय असल्याचे समजले जाते.

गुळाचे दान- गूळाच्या दानाने पित्तर लवकर प्रसन्न होतात असा समज आहे. यामुळे पितृपक्षात गूळाचे दान केले जाते.

मीठ दान- मीठाचे दान करण्याआधी आपल्या पित्तरांचे स्मरण करावे. त्यानंतर ब्राम्हण किंवा इतर व्यक्तीला भोजन द्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या