ही बातमी वाचाल तर पुन्हा पिझ्झा खाणार नाही! डिलीव्हरी बॉयला अटक

2004

शीर्षक वाचून तुम्हाला नक्कीच किळस आली असेल. कारण, आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जेवण मागवत असतो. त्यात पिझ्झा या पदार्थाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. अशाच एका माणसाने ऑनलाईन मागवलेल्या पिझ्झावर थुंकलेल्या डिलीव्हरी बॉयला 18 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 2017मध्ये तुर्कस्तानच्या एस्किशर नावाच्या शहरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या एका व्यक्तिने ऑनलाईन पिझ्झा मागवला होता. बुराक नावाच्या डिलीव्हरी बॉय त्याची डिलीव्हरी करायला आला होता. पिझ्झाचं पार्सल डिलीव्हर करण्याआधी त्याने ते उघडलं आणि त्यात थुंकला. स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंगही केलं. ही घटना उघड झाल्यानंतर बुराकला अटक झाली.

त्याचं हे कृत्य या ग्राहकाच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीला आलं. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि त्याला कोर्टाने 4000 लीरा ( 600 पाउंड)चा दंड ठोठावला. बुराकने असं का केलं, हे सांगण्यासाठी तो असमर्थ ठरला. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी घेताना हे कृत्य ग्राहकाचं आरोग्य आणि त्याचा विक्रेत्यावरचा विश्वास या दोघांनाही धोकादायक असल्याचं आढळल्याने कोर्टाने बुराकला 18 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली.

आपली प्रतिक्रिया द्या