डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत भेटला ‘पीके’

56

श्रीरंग खरे । डोंबिवली

पारंपारिक वेश, ढोलताशे, ऐतिहासिक चरित्र, चित्ररथ हे डोंबिवलीतल्या नववर्ष स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे. यंदा मात्र त्यात आणखी एकाची भर पडली ती म्हणजे ‘पीके’ची. बॉलिवूड अभिनेता आमीर खाननं साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. त्याच वेशात स्वागत यात्रेत हा ‘पीके’ पाहायला मिळाला.

पिवळं हेलमेट, गळ्यात रुद्राक्ष माळा, जुना रेडिओ, अशा वेशातला हा ‘पीके’ सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेत होता. छोट्या मुलांनी तर पीकेशी मस्ती केली. अनेकांनी त्याला आगरी भाषेत बोल की, असं म्हणत त्याला हैराण केलं. पण तरी हा ‘पीके’ मात्र स्वागत यात्रेचा आनंद घेत होता.

आपली प्रतिक्रिया द्या