आसमान से गिरे, तारों में अटके…

1784

प्रवास जलद आणि सुलभ होण्यासाठी अनेकजण हवाईमार्गाने प्रवास करतात. मात्र, एखादे विमान दुर्घनाग्रस्त होऊन जमीनीवर पडण्याऐवजी तारांवरच उलटे लटकले तर प्रवाशांची काय अवस्था होईल…विचारानेच अंगावर काटा येतो. अशीच एक घटना इटलीमध्ये घडली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

इटलीमध्ये हवेतच एक विमानात बिघाड झाल्याने ते वेगाने खाली आले. जमीनीवर कोसळण्याआधी ते उंचावर असणाऱ्या तारांमध्ये अडकले आणि उलटे झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. सुदैवाने विमान तारांमध्ये अडकल्याने जिवीतहानी टळली आहे. पायलटसह सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात बचाव दलाला यश आले आहे. विमान तारांमध्ये उलटे लटकल्याने प्रवाशांना कसे बाहेर काढायचे असा पेच उभा होता. मात्र, बचाव दलाने पायलट आणि प्रवाशांना विमानाच्या पंख्यावर आणले आणि त्यांची सुखरुप सुटका केली. सुमारे दोन तास बचावकार्य सुरू होते.

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर डोंगाराळ भागात विमानाचे  संतुलन बिघडले. वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. विमान वेगाने खाली आले आणि डोंगराळ भागात उंचावर असणाऱ्या तारांमध्ये अडकून उलटे झाले. सुदैवाने विमान तारांमध्ये अडकले. विमान जमीनीवर कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले असते तर मोठी जिवीतहानी झाली असती, असे प्रवाशांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या