चिनाब खोर्‍यातील नागरिकांना शस्त्रे दिल्यास गंभीर परिणाम होतील : मेहबुबा मुफ्ती

196

सामना ऑनलाईन । श्रीनगर

संवदेनशील समजले जाणार्‍या चिनाब खोर्‍यातील नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकार हत्यार देण्याची योजना आखत आहेत. या योजनेमुळे गंभीर परिणाम होतील असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री मेहमुबा मुफ्ती यांनी केले आहे. 1990 च्या दशकात दहशतवादाविरोधी अभियनाअत अशाच प्रकारे सामान्य नागरिकांना शस्त्र पुरवली होती तेव्हा अराजक माजले होते आणि त्याची जखम अजूनही भरलेली नाही असेही मुफ्ती म्हणाल्या.

पीपल डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मुफ्ती म्हणाअल्या की, “चिनाब खोर्‍यात ग्राम रक्षा समिती बनवण्याच्या बहाण्याने सरकार सामान्य नागरिकांच्या हातात शस्त्र देणार आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे. अशावेळी गोंधळलेल्या तरुणाईला सरकारने धीर दिला पाहिजे असेही मुफ्ती म्हणाल्या.

90 च्या दशकात अशा प्रकारची समिती डोडा, किश्तवाड, रांबा, राजौरी, रियासी, कठुआ आणि पुंछ जिल्ह्यातील काही भागात निर्माण करण्यात आल्या होत्या. लोकांच्या स्वरंक्षणासाठी या समिती निर्माण करण्यात आल्या होता.

आपली प्रतिक्रिया द्या