प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

36

सामना ऑनलाईन । मुंबई

प्लॅस्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा भस्मासुर संपवण्यासाठी पालिकेने मुंबईत विविध सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक बॉटल क्रशर बसवण्याचे ठरवले आहे. पालिका मुख्यालयात दोन मशीन बसवण्यात आल्या असून त्याचे उद्घाटन आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

प्रत्येक प्रभागातील पर्यटनस्थळे, उद्याने, मार्केट अशी सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे शोधण्याचे आदेश संबंधित सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. ‘ए’ विभागातील नरीमन पॉइंट, मरीन लाइन्स, गेट वे ऑफ इंडिया अशा सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी जास्त मशीन्स ठेवण्यात येणार आहेत. या मशीनमध्ये दिवसाला तब्बल ५० हजार बाटल्यांची विल्हेवाट लावता येते.

पालिकेने बॉटल क्रशरच्या ५०० मशीन्स मुंबईत विविध ठिकाणी बसवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी दोन मशीन्स पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या