आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संगीता चांदोरकर घडवणार खेळाडू

30

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू रिझर्व्ह बँकेची संगीता चांदोरकर स्वतःची कॅरम ऍकॅडमी सुरू करत आहे. नायगाव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात या ऍकॅडमीचा शुभारंभ उद्या 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या ऍकॅडमीतून होतकरू व गुणवत्ताप्रधान खेळाडू घडवण्याचे काम त्या या वेळी करतील. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने या ऍकॅडमीसाठी तिला खास जागा उपलब्ध करून दिली आहे. या ऍकॅडमीतून तिला उद्याचे युवा कॅरमपटू तयार करायचे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या