आकडेवारी नको कोरोनावरील रणनिती सांगा, पंतप्रधान मोदींनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले

कोरोना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या बैठकीत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी खट्टर यांना सुनावले आहे.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर पंतप्रधान मोदींना राज्यातील कोरोनाची स्थिती सांगत होते. तेव्हा मोदींनी त्यांना मध्येच थांबवत “मला आकडेवारी सांगू नका, कोरोना संकट आटोक्यात आणण्यासाठी काय रणनिती आखली आहे, काय उपाययोजना आखण्यात येत आहे त्याबद्दल माहिती द्या” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुरूवातीलाच राज्यातील कोरोनाची आकडेवारी, सक्रिय रुग्ण आणि मृतांची आकडेवारी देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत सध्या 20 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण असून एकूण आकडा दोन लाख 25  हजाराच्या वर गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या