राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9, शहांच्या 18 सभा होणार! – चंद्रकांत पाटील

5098

#Mahaelection2019 विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची उद्या 7 ऑक्टोबरला शेवटची तारीख आहे. यानंतर राज्यामध्ये प्रचाराचा धुरळा खऱ्या अर्थाने उडणार आहे. याअनुषंगाने भाजपची विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या खाद्यांवर घेतल्याचे दिसते.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरयाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ 9 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी 17 ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमित शहा यांच्या सभांच्या तारखा आणि ठिकाणही अद्याप निश्चित झाले नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मतदान – 21 ऑक्टोबर
मतमोजणी – 24 ऑक्टोबर

आपली प्रतिक्रिया द्या