निकालांनंतर मोदी-राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर, स्मितहास्यही टाळले

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रातील भाजप सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात प्रत्येक मुद्द्यावरून तू-तू-मै-मै सुरू असते. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील प्रत्येक सभा, भाषणातून एकमेकांची उणीदुणी काढत असतात. हे चित्र फक्त दूर असतानाच नाही तर एकमेकांसमोर असतानाही दिसून आले.

गुरुवारी संसदेमध्ये संसद हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झाल्याने शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आमनेसामने आले. परंतु दोघांनी अंतर राखले आणि एकमेकांकडे पाहिलेही नाही. तसेच स्मितहास्यही टाळले. यावेळी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेत हस्तांदोलन केले. विशेष म्हणजे मोदींच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले. केंद्री मंत्री विजय गोयल आणि रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्याची हस्तांदोलन केले परंतु मोदी आणि राहुल गांधी एकमेकांची ओळख नसल्यासारखे वागत होते.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील भाजपची सत्ता उलथवून टाकली. या निकालानंतर पहिल्यांदाच मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या