पंतप्रधान दुसऱ्या टप्प्यात लस घेणार; मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्र्यांनाही डोस मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेणार आहेत. याच टप्प्यात 50 वर्षे वयापुढील मुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही लस दिली जाणार आहे. कोरोना लसीबाबत जनतेच्या मनात असलेली भिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी पुढच्याच टप्प्यात लोकप्रतिनिधींना लस टोचण्यात येणार आहे.

देशातील 3 कोटींहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना डोस दिल्यानंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सुरुवातीच्या पाच दिवसांत 7 लाख 86 हजार 842 जणांनी लस घेतली आहे. हा टप्पा एप्रिल-मेपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः डोस घेऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी अजून लस घेतली नसल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या