‘२६/११’च्या हल्ल्यात बचावलेल्या मोशेची पंतप्रधानांनी घेतली भेट

18

सामना ऑनलाईन, तेल अवीव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यात २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सुखरूप बचावलेल्या बेबी मोशेची भेट घेतली. हल्ल्यावेळी मोशे अवघा दोन वर्षांचा होता. या पंतप्रधानांनी मोशेला हवे तेव्हा हिंदुस्थानात ये, तुला लाँग टर्म व्हिसा दिला जाईल असे सांगितले.

२६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ला केला. मुंबईतील नरीमन हाऊसवर केलेल्या हल्ल्यात मोशेचे आई रिवका आणि वडिल गॉक्रिएल होल्टझबर्ग यांचा मृत्यू झाला. मोशेच्या केअरटेकर सॅड्रा सॅम्युअल यांनी त्याचे प्राण वाचविले. सँड्रा यांच्यामुळे मोशे बचावला. या हल्ल्यानंतर मोशे इस्त्रायलमध्ये गेला. आजी येहुदीत आणि आजोबा राब्बी होल्टझबर्ग यांच्याबरोबर राहतो. केअर टेकर सँड्रा  यांनाही इस्त्रायल सरकारने नागरिकत्व दिले आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी मोशेची भेट घेतली. मोशे आता ११ वर्षांचा आहे. याभेटीवेळी मोशेचे आजी-आजोबा आणि सँड्राही होत्या. या भेटीवेळी मोशे भारावला होता. मोशेने कधीही हिंदुस्थान भेटीवर यावे त्याला लाँगटर्म व्हिसा देऊ असे पंतप्रधानांनी सांगितले.

दहशतवादी कारवायांची झळ हिंदुस्थानला बसत आहे. इस्रायलही दहशतवादाविरुद्ध लढत आहे. यापुढे दोन्ही देश एकजुटीने हा लढा देतील असे दोन्ही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

हिंदुस्थान आणि इस्रायलमधील मैत्रीच्या गाठी स्वर्गातच बांधल्या गेल्या आहेत. आपण त्यांना केवळ मूर्तरूप देत आहोत, असे उद्गार पंतप्रधान नेतान्याहू यांनी काढले.

 

आपली प्रतिक्रिया द्या