पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांची वाढ, तर अमित शहांना शेअर बाजारातील चढउतराचा फटका

modi-shah

कॅबिनेट मंत्र्यांसह पंतप्रधानांना देखील आता आपल्या संपत्तीची घोषणा करणे अनिवार्य आहे. त्यानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 30 जून 2020 रोजी 2.85 कोटी रुपये इतकी झाली आहे. मात्र गृहमंत्री अमित शहा यांना शेअर बाजारातील चढउताराचा फटका बसला आहे.

गेल्यावर्षी पंतप्रधान मोदी यांची संपत्ती 2.49 कोटी इतकी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत बँका आणि अन्य सुरक्षित ठिकाणी गुंतवल्याने वाढ झाल्याचे समजते. त्यांना बँकांकडून 3.3 लाख परतावा मिळाला आहे. तर अन्य गुंतवणुकीतून 33 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 31,450 रुपये रोख स्वरुपात होत्या. तर गांधीनगरच्या स्टेट बँकेच्या एनएससी ब्रँचमधील खात्यात 3,38,173 रुपये जमा आहेत. याच खात्यात एफडीआर आणि एमओडीमध्ये 1,60,28,939 रुपये जमा आहे. टपाल विभागाच्या नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट मध्ये 8,43,124 रुपये इतके रुपये आहेत. वीमा पॉलिसीमध्ये 1,50,957 रुपये आणि टॅक्स सेविंग्स बॉन्डमध्ये 20,000 रुपये आहेत. तसेच जंगम संपत्ती 1.75 कोटी रुपये आहे.

पंतप्रधान मोदींनी कोणतेही लोन घेतलेले नाही. त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही. त्यांच्याकडे 45 ग्रॅमच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 1.5 लाख रुपये इतकी आहे.

तर स्थावर मालमत्तेत भागीदारीतील मालिकीचा गांधीनगर सेक्टर – 1 मध्ये 3531 स्केअर फुटाचा फ्लॅट आहे. हा चार जणांच्या भागीदारीत आहे. प्रत्येकाच्या हिस्स्यात 25-25 टक्के आहे. 25 ऑक्टोबर 2002 मध्ये म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याच्या दोन महिने आधी त्यांनी हे घर खरेदी केले होते. तेव्हा त्याची किंमत 1.3 लाख होती. मोदींकडे एकूण स्थावर मालमत्ता ही 1.10 कोटी रुपये इतकी आहे.

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सधन परिवारातून आहेत. मात्र शेअर बाजारातील चढउतारामुळे त्यांना थोडे नुकसान झाले आहे. जून 2020 रोजी त्यांची घोषित संपत्ती 28.63 कोटी रुपये इतकी होती. गेल्यावर्षी त्यांच्याकडे 32.3 कोटी रुपये इतकी घोषित संपत्ती होती. अमित शहा यांच्याकडे 10 स्थावर मालमत्ता आहेत. मात्र सर्व गुजरातमधीलच आहेत. वारसाहक्काने 13.56 कोटी रुपये संपत्ती त्यांना मिळाली आहे. त्याच्याकडे अवघी 15,814 रुपये रोख रक्कम आहे. तर खात्यात 1.04 रुपये, वीमा आणि पेन्शन पॉलिसीत 13.47 लाख रुपये, एफडीमध्ये 2.79 रुपये आहेत. तसेच 44.47 लाख रुपयांचे दागिने आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या