पावसाच्या ‘रेड अॅलर्ट’मुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द

776

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या शनिवारी होणारा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपूरमध्ये पावसाचा ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नागपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डीदरम्यानचा 11 किलोमीटरच्या रिच-3 टप्प्यातील प्रवासी सेवेच उद्घाटन होणार होते. तसेच मोदी सुभाषनगर मेट्रो स्थानकावरून सीताबर्डी दरम्यान मेट्रोने प्रवासही करणार होते. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मानकापूर क्रीडा संकुलात होणारा मुख्य कार्यक्रमात मेट्रोसह इतर प्रकल्पांशी संबंधित उद्घाटन करणार होते. मात्र शुक्रवार दुपारपासून नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली. यानंतर हवामान विभागाने शनिवारी अतिवृष्टीचा इशारा दिला. यामुळे मोदींचा हा दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या