
सामना ऑनलाईन । मुंबई
सागरी मार्गाने होणारी घुसखोरी तसेच पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना रोखण्यासाठी हिंदुस्थानच्या नौदलात स्वदेशी बनावटीची आयएनएस कलवरी ही पाणबुडी दाखल झाली आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे अदृश्य राहून शत्रूच्या रडारला चकवून भेदक हल्ले करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सोहळ्यात आयएनएस कलवरी नौदलात दाखल करण्यात आली.
पंतप्रधानांनी पाणबुडीचे नामकरण ‘सागर’ (S. A. G. A. R.) असे केले. सागर म्हणजे ‘security and growth for all in the region’ अर्थात सगळ्यांच्या संरक्षण आणि प्रगतीसाठी असे पंतप्रधानांनी सांगितले.
सागरी मार्गाने होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया, चाचेगिरी, तस्करी, चोरी, शत्रूच्या कारवाया, बेकायदा मासेमारी अशा विविध आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आयएनएस कलवरी या पाणबुडीत आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हाने आणखी गुंतागुंतीची होत आहेत. या परिस्थितीत हिंदुस्थान आणि फ्रान्स यांनी धोरणात्मक भागीदारी करुन आयएनएस कलवरी विकसित केली आहे. कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केली आहे. अशा प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या हिंदुस्थानच्या नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे.
Mumbai: #INSKalvari, first made-in-India Scorpene class submarine commissioned into the Navy pic.twitter.com/3LtRYHrH9W
— ANI (@ANI) December 14, 2017