पंतप्रधान मोदी लेहला, मिरच्या झोंबल्या चीनला; दिलं तात्काळ निवेदन

7644

हिंदुस्थान-चीनच्या सीमा भागात तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये जवानांच्या तुकडीला अचानक भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यावरून चीनलाही जोरदार संदेश मिळाला आहे. त्यामुळेचे मोदी लेहमध्ये पोहोचल्यावर काही तासात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्यावर एक निवेदन दिले आहे. वातावरण बिघडेल असे दोन्ही बाजूंनी काही करू नये, असे चीनचे म्हणणे आहे.

दररोज चीन मधील प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येते. यादरम्यान, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, ‘हिंदुस्थान आणि चीन सीमेवर सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी सैन्य आणि डिप्लोमॅटिक संवाद सातत्याने सुरू आहे. अशा परिस्थितीत कुठल्याही पक्षाने असे काहीही करू नये ज्यामुळे सीमेवर तणाव निर्माण होईल.’

पूर्वेकडील लडाखमध्ये हिंदुस्थान-चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी लेह-लडाख आणि अन्य ठिकाणांना भेट दिली. सीमेवरील जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी संवाद साधला. त्या दरम्यान चीनचे हे विधान समोर आले आहे. चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या हिंसक संघर्षानंतर 18 दिवसांनी पंतप्रधान मोदी यांनी हा दौरा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या