पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम मोडला!

2177
pm-modi-15-aug-2019-new
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे.

भारतीय जनता पक्षाने 2014 ला प्रचंड बहुमत मिळवून सत्ता मिळवली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2019 ला देखील भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्ता मिळवली आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. आता त्यांनी भाजपचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला असून सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाची नोंद झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी वाजपेयी यांना मागे टाकत आत्तापर्यंत सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकूण 2268 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते. काँग्रेस पक्षा व्यतिरिक्त सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा रेकॉर्ड वाजपेयी यांच्या नावावर होता. आता हा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे.

देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावावर आहे. पंडित नेहरू तब्बल 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान पदावर विराजमान होते. पंडित नेहरू यांच्या सुपुत्री दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी 15 वर्ष 350 दिवस देशाच्या पंतप्रधान पदावर होत्या. तिसऱ्या स्थानावर मनमोहन सिंग असून ते 10 वर्ष 4 दिवस देशाचे पंतप्रधान होते.

तर सर्वात कमी वेळेसाठी पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर असून लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर गुलजारी लाल नंदा यांनी 11 जानेवारी 1966 पासून 24 जानेवारी 1966 पर्यंत अवघ्या 13 दिवसांच्या कालावधीसाठी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून जबाबदारी हाताळली होती.

आपली प्रतिक्रिया द्या