लेह दौर्‍यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; या मुद्द्यांवर झाली चर्चा

604

हिंदुस्थान-चीनच्या सीमा भागात तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहमध्ये जवानांच्या तुकडीला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यावरून चीनलाही जोरदार संदेश मिळाला आहे. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. सुमारे अर्ध्या तासाच्या या बैठकीत या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.’

शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी सीमेच्या परिस्थितीचा आढावा घेत सैनिकांना संबोधितही केले. हिंदुस्थान-चीनच्या सीमा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक महत्त्वपूर्ण ट्वीट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘हिंदुस्थान इतिहासाच्या अत्यंत नाजूक वळणावर जात आहे. आपण एकाच वेळी बर्‍याच अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरे जात आहोत. मात्र आपल्याला जे आव्हाने दिली जात आहेत, त्याच्या सामोरे जाण्यासाठी आपण दृढ निश्चय केले पाहिजे. ‘

आपली प्रतिक्रिया द्या