माझा कितीही विनोदी फोटो बनवा, गुन्हा दाखल करणार नाही; मोदींचा ममतांना टोला

84

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पश्चिम बंगालमधील बशीरहाट येथे विराट सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ज्या मुलींना तुम्ही तुरुंगामध्ये टाकण्याचा काम करत आहेत, त्याच तुम्हाला धडा शिकवतील. एका फोटोसाठी एवढा संताप. एकीकडे ममतादीदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहेत आणि दुसरीकडे कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

ममतांचा विनोदी फोटो पोस्ट करणाऱ्या प्रियंकांचा माफी मागण्यास नकार

लोकसभा निवडणूक सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये असून 19 मे रोजी 8 राज्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अंतिम टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होत आहे. बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यांनी मोदींनी बुधवारी येथे सभा घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलवर निशाणा साधला.

मोदी पुढे म्हणाले, ‘दीदी तुम्ही स्वत: एक कलाकार आहेत. तुम्ही माझे विनोदी चित्र बनवा आणि 23 मे नंतर मी पंतप्रधानपदाची शपथ घेईल तेव्हा मला ते द्या. मी तुमच्यावर एफआयआर दाखल करणार नाही.’ याआधी ममता बॅनर्जी यांचा विनोदी फोटो पोस्ट केल्यामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्या प्रियंका शर्मा यांना अटक करण्यात आली होती. याचाच संदर्भ देत मोदींनी ममता बॅनर्जी यांना टोला लगावला.

पराभवाच्या भीतीने घबराट
ममता बॅनर्जी या पराभवाच्या भीतीने बावरल्या आहेत. पश्चिम बंगालमधून त्यांचा पत्ता साफ होणार असल्याचे त्यांना कळाले आहे. त्यामुळे त्या भाजपच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालत आहेत. परंतु लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज दाबण्याऐवजी तुम्ही त्यांचा आवाज ऐकूण घ्यावा, मग तो चांगला असो किंवा वाईट, असल्याचे मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या