Lok Sabha 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला घेणार पत्रकार परिषद? वाचा काय आहे सत्य

सामना ऑनलाईन । वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिलला त्यांचा मतदार संघ वाराणसीत पत्रकार परिषद घेणार आहेत अशी चर्चा बुधवारी दुपारी रंगली होती. गेल्या 5 वर्षात त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद असणार असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली. मात्र काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषद घेणार नसल्याचे भाजपकडून  स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेची बातमी खोटी ठरल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका करत ‘तुम्हाला ते शक्य नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 एप्रिलला वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या दिवशी वाराणसीत मोदी मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन करतील.