शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत, पंतप्रधान मोदींचे विनम्र अभिवादन

2532
modi-naman

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वा जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातून विविध मान्यवर त्यांना आदरांजली वाहत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत, असेही त्यांनी आपल्या ट्वीट मधून म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी लिहितात, ‘महान नेते बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली. धैर्यवान आणि अदम्य… जनतेच्या हितासाठीचे प्रश्न उपस्थित करण्यास त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच हिंदुस्थानचे नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते आजही लाखों लोकांना प्रेरणा देत आहेत.’

आपली प्रतिक्रिया द्या