पीएमसी बँक घोटाळा, ‘एचडीआयएल’ची मालमत्ता विकण्याला स्थगिती

636

दिवाळखोरीत निघालेल्या पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इफ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) संपत्ती विकण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली.

शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व रिझर्व्ह बँकेच्या विनंती याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एचडीआयएलची मालमत्ता विकण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती आणली. मात्र या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरूच ठेवावी असे निर्देश दिले. आरबीआयचे म्हणणे ऐकून न घेता उच्च न्यायालयाने वरील लिलावाचा निर्णय दिला होता, हा ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांचा युक्तिवाद शिखर न्यायालयाने ग्राह्य धरला.

आपली प्रतिक्रिया द्या