६० हजार कोटींचा आहे पीएनबी महाघोटाळा ?

622

सामना ऑनलाईन। मुंबई

संपूर्ण देशाला हादरवरुन टाकणाऱ्या पंजाब नॅशनल बँक महाघोटाळ्यामध्ये रोज नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा महाघोटाळा ११ हजार कोटींचा असल्याचे मानले जात होते मात्र नव्या माहितीनुसार हा घोटाळा तब्बल ६० हजार कोटींचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँककेकडून ( आरबीआय) उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारावर रॉयटर्सने याबद्दल वृ्त प्रसिध्द केले आहे. पीएनबी घोटाळा प्रकरण तपासादरम्यान सीबीआयला महत्वाचे कागदपत्रे सापडली आहेत. या कागदपत्रामधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.

रॉयटर्सला मिळालेल्या डेटानुसार गेल्या वर्षापर्यंत बँककर्ज घोटाळा प्रकरणं १४९ अब्ज डॉलरपर्यत पोहचले होते. तर चालू आर्थिक वर्षात बँक कर्ज घोटाळा प्रकरणात वेगाने वाढ झाली हा आकडा १७६.३४ अब्ज रुपयांपर्यंत पोहचला आहे. या आकडेवारीनुसार २०१२-१३ मध्ये बँक घोटाळा प्रकरणाची रक्कम ६३.५७ अब्ज रुपये होते. पण या घोटाळ्यात पीएनबीचा समावेश नव्हता. आरबीआयकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी बँकांमध्ये फसवणुकीची प्रकरणं वाढत असल्याने अनेक नवीन आव्हाने उभी असल्याचे मान्य केले होते.

तर दुसरीकडे सीबीआयने पीएनबी घोटाळ्यात ६,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. सीबीआयने आपल्या रिमांड अर्जात पीएनबीचे अधिकारी हेमंत भट तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले आहे. हेमंत भटला सीबीआयने शनिवारी सकाळी अटक केली होती.आतापर्यंत ईडीने पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या २१ ठिकाणांवर छापे घातले आहेत. या कारवाई दरम्यान ईडीने ५,६७४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून यात २५ कोटी रुपयांचे दागिनेही आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या