पन्हळे धरणाला गळती, तात्काळ डागडुजी करा खासदार विनायक राऊत यांची सूचना

लांजा तालुक्यातील पन्हळे धरणाला गळती लागल्याने आज खासदार विनायक राऊत यांनी धरणाची पहाणी करत तातडीने डागडुगी करण्याच्या सूचना दिल्या. पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांना जास्तीजास्त प्रमाणामध्ये धरणातील पाणी प्रथम कमी करून डागडुजी करा. धरणाच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. दुरूस्तीची तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या व इतर कालव्या संदर्भ कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या.

यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक .शरद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन सदस्य व उद्योजक किरण सामंत,विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, शिवसेना लांजा तालुकाप्रमुख संदिप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख श्री.प्रकाश कुवळेकर, कार्यकारी अभियंता पाटील व लांजा तहसिलदार ओमासे, लांजा उपतालुकाप्रमुख सुरेश करंबळे, राजापूर उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, जि.प.सदस्या स्वरुपा साळवी, जि.प.सदस्य चंद्रकांत मणचेकर, लांजा सभापती लिला घडशी, उपसभापती दिपाली दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी नगराध्यक्ष राजू कुरूप, विभागसंघटक रविंद्र डोळस, विभागप्रमुख शरद चरकरी, गवाणे उपविभागप्रमुख सिध्देश पांचाळ, उपविभागप्रमुख राजेंद्र पालये, सहकार विभागप्रमुख.प्रकाश गुरव, लांजा नगरसेवक राजू हळदणकर, प्रसाद भाईशेटये,मंगेश बापेरकर, स्वरुप गुरव, वैभव जोईल, सचिन डोंगरकर,तुकाराम मसणे, .जनक जागुष्टे,रामदास खानविलकर, श्री.विजय जाधव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या