6 कॅमेरावाला दमदार फोन लॉन्च, तासाभरात होणार चार्ज; वाचा किंमत आणि वैशिष्ट्य

स्मार्टफोन क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या चीनच्या शाओमी (Xiaomi) या कंपनीपासून वेगळे होत Poco ने आपला नवीन स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. Poco X2 असे या स्मार्टफोनचे नाव असून 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएन्टची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये असणार आहे.

poco-x2-price-in-india

Poco X2 हा स्मार्टफोन ब्लू, मीट्रिक्स पर्पल आणि फिनिक्स रेड या रंगामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला कंपनीने सहा कॅमेरे दिले आहेत. यातील चार पाठीमागच्या बाजूला तर दोन कॅमेरे समोरच्या बाजूला आहेत. विशेष म्हणजे अवघ्या एका तासामध्ये हा स्मार्टफोन चार्ज होत असल्याने तरुणांसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

किंमत –

  • 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे.
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे.
  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे.

poco-x2-price

डिस्काउंट –

हा स्मार्टफोन 11 फेब्रुवारी 2020 पासून फिल्पकार्टवर विक्रीसाठी उबलब्ध असणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड किंवा ईएमआय ट्रान्झाक्शनवर खरेदीदाराला 1 हजार रुपयांचा डिस्काउंटही मिळणार आहे.

वैशिष्ट्य –

  • 6.67 इंचचा डिस्प्ले
  • 4500 एमएएचची बॅटरी (68 मिनिटात फुल चार्ज होईल असा कंपनीचा दावा)
  • 6 कॅमेरे (4 रियर आणि 2 फ्रंट)
  • प्रायमरी कॅमेरा 64 एमपी, तर फ्रंट कॅमेरा 20 एमपीचा
  • तीन रंगांमध्ये फोन उपबल्ध

आपली प्रतिक्रिया द्या