बाबा! तुमचे ठायी

34

अनंत काळे, संभाजीनगर

विचारांची दिशा, आचारांची प्रभा

सूर्यतेजाची आभा, बाबा! तुमचे ठायी।

दिव्यत्वाचे तेज, बुद्धिमत्ता अपार

विद्वत्तेचे सार, बाबा! तुमचे ठायी।

शिक्षणाचा वसा, शिक्षणाचा ध्यास

आदर्श शिकवण, बाबा! तुमचे ठायी।

प्रचंड वाचन, अखंड ते चिंतन

दिव्यदृष्टी लोचन, बाबा! तुमचे ठायी।

विविधांगी लेखन, वक्तृत्वही छान

कळी-काळाचं भान, बाबा! तुमचे ठायी।

न्याय, नीतिमत्ता, बहु कार्य सिद्धता

वंचितांचा दाता, बाबा! तुमचे ठायी।

अधिकार वाणी, कर्तव्यही जाणी

पत्रकार लेखणी, बाबा! तुमचे ठायी।

एकत्वाची भावना, ही राष्ट्राची जननी

विचारांची पर्वणी, बाबा! तुमचे ठायी।

घटना लेखन, करूया पालन

विश्वाचं कल्याण, बाबा! तुमचे ठायी।

आपली प्रतिक्रिया द्या