भाजपावर टिका केल्यामुळे केरळचे कवी सच्चिदानंद यांच्यावर ‘फेसबुक बंदी’

केरळ विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाबद्दल उपरोधिक टीका करणारा व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न आपण केला.मात्र ,त्यानंतर फेसबुकने आपल्यावर लाइक ,कमेंट आणि पोस्ट शेअर करण्यावर बंदी घातली आहे,असा आरोप प्रख्यात मल्याळी कवी के.सच्चिदानंदन यांनी केला आहे,असा आरोप प्रख्यात मल्याली कवी के.सच्चीदानंदन यांनी केला आहे.सोशल मिडिया मंचावर 30 दिवसांपर्यंत लाइव्ह हजेरी लावण्यासाठी बंदी घातली आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.

साहित्य अकादमीचे माजी सचिव सच्चिदानंदन म्हणाले की,आपण भाजपाच्या पराभवासंदर्भात उपहासात्मक व्हिडीओ पोस्ट करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा फेसबुकचा एक संदेश आपल्याला आला.त्यात आपण कंपनीच्या मानकांचे उल्लंघन कोल्याचा आरोप करण्यात आला होता.

हा व्हिडीओ अन्य सोशल मीडीया मंचावरही प्रसारित करण्यात आला होता तसेच या व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केलेले नाही,असेही सच्चिदानंद यांनी म्हटले आहे.फेसबुक डाव्या टीकाकारांवर नजर ठेवून असते,असा आपला आजवरचा अनुभव असल्याचा आरोपही सच्चिदानंदन यांनी केला आहे.

फेसबुकच्या कारवाईवर मतमतांतरे

भाजपाच्या केरळ शाखेने फेसबुकची सच्चिदानंदन यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि कोणालाही सोशल मीडियी मंचाच्या मानकांचे उल्लंघन करण्याची परवानगी देऊ नये,असे भाजप केरळ शाखेने म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि माकपचे नेते टीएम थॉमस आयजॅक यांनी सच्चिदानंदन यांच्याविरोधात कारवाई केल्याबद्दल फेसबुकवर टीका केली आहे. केरळमधील कलाकार,लेखक आणि कला व साहित्यप्रेमींची ‘पुरोगामना कला साहित्य संघम’ ही संघटना आणि ‘सीपीआय’च्या (एम) युवा संघटनेच्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियानेही फेसबुकच्या या कृतीचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या