पाकिस्तानमध्ये शरीफ यांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकव्याप्त कश्मीरमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारकडून नागरिकांवर सातत्याने अत्याचार करण्यात येत आहेत. याविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आज रविवारी इस्लामाबादमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी शरीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको केला.

पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा दिवस कश्मीर  दिवस म्हणून पाळला जातो. त्याच दिवशी पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिकांनी शरीफ यांच्या विरोधात आंदोलन छेडले.

शरीफ सरकार आयएसआय व स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी करुन नागरिकांचा छळ करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तसेच पाकव्याप्त कश्मीरमधील ब्लॉगर्सला लिखाणाचे स्वातंत्र्य देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

गेल्या वर्षी बलुचिस्तान व गिलगिट-बाल्टीस्तानमध्येही पाकिस्तान सरकार व लष्कराविरोधात नागरिकांनी आंदोलन छेडले होते. पाकिस्तान परत जा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या होत्या.घोषणा देणा-या आंदोलकांना तुरुगांत डांबण्यात आले होते.