इंडिया ऑनलाइन पोकर; हर्षित सांघी मुख्य विजेता

290

दुसऱया इंडिया ऑनलाइन पोकर स्पर्धेच्या (आयओपीसी) मुख्य प्रकारात हर्षित सांघी मुख्य विजेत्या ठरला. त्याने 47. 33 लाख रुपये जिंकताना रिगल एटीन के गोल्ड आयओपीसी चषक पटकावला. हर्षित हा हिंदुस्थानचा पहिला ऑनलाइन पोकर विजेता ठरला आहे. अंतिम फेरीत हर्षितने कुणाल भाटियावर (42. 36 लाख ) मात केली. यंदाच्या स्पर्धेसाठी 90,900 प्रवेशिका आल्या होत्या. या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल स्पार्टन पोकरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अमीन रोझानी यांनी समाधान व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या