पोलंडच्या चौकाला हरिवंशराय बच्चन यांचं नाव! गहिवरले बिग बी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पिता आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचं नाव पोलंड या देशातील एका चौकाला देण्यात आलं आहे.

पोलंड येथील व्रोकला शहरातील हा चौक असून काही दिवसांनी हा नामकरण सोहळा होणार आहे. याबाबत माहिती मिळताच बिग बींनी एक हळवी पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

काय म्हणाले बिग बी

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी प्रबिसि नगर कीजे सब काजा. हृदयं राखि कोसलपुर राजा.’ या रामचरितमानस ग्रंथातील सुंदर कांड पर्वातील ओळी लिहिल्या आहेत. या ओळींचा भावार्थ असा की, अयोध्येचे राजा श्री रघुनाथ (श्री राम) यांना हृदयात ठेवून नगरात प्रवेश करा आणि मग तुमचं कार्य पूर्ण करा. व्रोकलॉ, पोलंड येथे एका चौकाला माझ्या वडिलांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ट्वीट अमिताभ यांनी केलं आहे.

https://twitter.com/juniorbachchan/status/1320575292612567041

गेल्यावर्षी देखील डिसेंबर महिन्या पोलंड येथील एका चर्चमध्ये हरिवंशराय बच्चन यांच्यासाठी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीही अमिताभ यांनी पोस्ट केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या