रात्रशाळेत शिकून ९० टक्के मिळवणाऱ्या अनिकेतला अटक

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या फतव्याने रात्रशाळा बंद करण्यात आल्या आहेत. तावडे यांच्या या आदेशाचा निषेध करण्यासाठी रात्रशाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी छात्र भारतीच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी रात्रशाळेत शिकून ९० टक्के मिळवणाऱ्या अनिकेत उडदे याच्यासह ३० विद्यार्थ्यांना अटक केली. अनिकेत उडदे हा टाइम्स समुहाच्या वितरण विभागात कामाला आहे, अशी माहिती छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिली.

aniket