चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक

31

सामना प्रतिनिधी । भिगवण

‘कानून के हाथ लंबे होते है’ हा डायलॉग आपण हिंदी चित्रपटात ऐकला असेल. हे शब्दश: खरे झाले आहे सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार वर्षांपूर्वी पलायन केलेला व बलात्कारासह अनेक गुन्हयात हात असलेल्या आरोपीला भिगवण पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल माधव गाडे (२५) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बलात्कार व अपहरण प्रकरणात चार वर्षांपूर्वी शिक्षा भोगत असलेला आरोपी सोलापूर मध्यवर्ती कारागृहातून सुमारे तीस फुटांच्या भिंतीवरुन उडी मारून फरार झाला होता. त्याच्याविरोधात मुलींना पळवून नेऊन बलात्कार तसेच इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे चार वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. सचिन शहाजी जाधव या खोट्या नावाने वावरून कोणालाही शंका न येता लपून बसला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे. भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या