महिलेच्या आवाजात गोळीबाराची खोटी बातमी देणारा गजाआड

30

सामना प्रतिनिधी । पिंपरी

महिलेच्या आवाजात गोळीबार झाल्याची खोटी बातमी देणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या दिपक पाटील असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. सांगवी पोलीसांनी ही कारवाई केली.

आरोपीने पिंपळे-गुरव येथील शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याचा कॉल एका महिलेने दिला आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने सांगवी पोलीसांना कळवली. पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, असा कोणताही प्रकार दिसून आला नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षक तसेच रहिवाशांकडे चौकशी केली. मात्र, गोळीबारासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला.

मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी माहिती मिळवली असता हनुमान सुधाकर कलगाने (१८) याचा मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता १८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मोबाईल चोरीला गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून प्रसाद पाटील याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या