‘घरगुती’ घोटाळा मंडळ, रमेश कदम यांच्या बायकोलाही अटक

173

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या बायकोलाही अटक करण्यात आली आहे. प्रतिभा कदम असे त्यांचे नाव असून त्यांनीही रमेश कदम यांना घोटाळ्यात मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रमेश कदम यांच्यावर महामंडळाच्या निधीचा गैरवापर करून करोडो रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होता. याच प्रकरणात त्यांना २०१५ साली अटक करण्यात आली होती. प्रतिभा कदम यांना अटकेनंतर भायखळा तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

रमेश कदम यांची २५० कोटींची मालमत्ता जप्त

रमेश कदम यांनी जी घरं खरेदी केली आहेत ती प्रतिभा कदम आणि त्यांच्या नावावर आहेत . तसेच कदम व त्यांच्या बायकोच्या सह्या वापरूनच महामंडळातील खात्यांमधून गैरमार्गाने पैसे काढल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील आणखी पुरावे गोळा करण्यासाठी प्रतिभा कदम यांच्या चौकशीची गरज असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. चौकशीसाठी पोलीस कोठडीची विनंती मान्य करत न्यायालयाने प्रतिभा कदम यांना ५ सप्टेंबरपर्यंत कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे.

राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदमांची १३५ कोटींची मालमत्ता जप्त करा! कोर्टाचे आदेश

SUMMARY : POLICE ARREST WIFE OF MLA RAMESH KADAM FOR CORRUPTION

आपली प्रतिक्रिया द्या