महिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव

65

सामना ऑनलाईन, अरिझोना

अमेरिकेतील अरिझोना भागातल्या पोलिसांनी 31 वर्षांच्या एका विकृताला अटक केली आहे. पॉल मेनचाका असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर आरोप आहे की त्याने गतिमंद होण्याचं नाटक केलं. त्याने हे नाटक महिलांनी आपल्याला आंघोळ घालावी जेणेकरून आंघोळ घालतेवेळी उद्दीपीत होण्याचा आनंद मिळावा यासाठी केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

मेनचाकाने गतिमंद तरूणाची काळजी घेण्यासाठी महिला सहाय्यकाची गरज आहे अशी जाहिरात स्वत:च वर्तमानपत्रात दिली होती. पॉलने आवाज बदलून एका सहाय्यक पुरवणाऱ्या संस्थेला फोन करूनही आपल्या मुलाला महिला सहाय्यकाची गरज असल्याचं सांगितलं होतं. यामुळे ३ महिला पुढे आल्या आणि त्यांनी पॉलची काळजी घ्यायला सुरुवात केली. गतिमंद असल्याचं बेमालून नाटक केल्याने या तीनही महिलांचा पॉलवर विश्वास बसला होता.

एका महिलेला आंघोळ घालत असतेवेळी पॉलला बरीच मजा येत असून तो उद्दीपीत होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर तिने पॉलला वरवर आंघोळ घालायला सुरुवात केली. यावर पॉलने आपलं गुप्तांग नीट साफ होत नसल्याची तक्रार केली. यामुळे महिला सहाय्यकाला संशय आला. तिने पॉलच्या आईवडीलांना कधीच बघितलं नव्हतं, तिने त्यांचा पत्ता शोधून काढत त्यांचं घर गाठलं. पॉलच्या आईला भेल्यानंतर तिने आपला मुलगा ठणठणीत असून तो गतिमंद वैगरे काही नसल्याचं सांगितलं. या महिला सहाय्यकाने त्यानंतर तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पॉलविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पॉलला अटक केली असून त्याने आपण खोटं बोलल्याचं कबूल केलंय. त्याने हे का केलं ते मात्र अजून कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या