नवी मुंबई: चोर समजून पोलिसांनाच बदडले

39
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
नवी मुंबईतील कोंबडभुजे गावात बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी साध्या वेषात गेलेल्या पोलिसांनाच चोर समजून गावकऱ्यांनी बदडल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांच्या या मारहाणीत ७ पोलीस जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंबडभुजे गावात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून रात्रीच्या अंधारात साध्या वेषातल पोलिसांचे एक पथक या गावात धडकले. मध्यरात्रीच्या सुमारास १०-१२ जणांचे एक टोळके गावात आल्याचे बघून गावकरीही सावध झाले. हे नक्कीच चोर असल्याचा गावकऱ्यांचा समज झाला. त्यानंतर माणसांची जमवाजमव करत गावकऱ्यांनी पोलिसांच्या पथकावरच लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आणि त्यांना बदडून काढले. आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना बोलण्याचीही संधी दिली नाही. या मारहाणीत पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या