#WomensDay – जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तांचे महिला अधिकाऱ्याला गिफ्ट

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांची स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. चव्हाण यांनी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी सन्मानित करण्यात येते. त्याशिवाय त्यांना विविध प्रकारच्या कामाची जबाबदारी दिली जाते. त्यानिमित्ताने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांची स्वारगेट विभागात सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विश्वास दाखवत मला स्वारगेट सहायक आयुक्त म्हणून कार्यभार दिला आहे. तो विश्वास मी सार्थ करून दाखवेन, असे सुषमा चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या