
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते देबब्रत सैकिया यांनी ही तक्रार केली आहे. मध्य प्रदेशातील विदिशा जिह्यातील एका रॅलीत हिमंत बिस्वा यांनी 18 सप्टेंबरला काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर टीका करताना 10 जनपथ जाळून टाकायला हवे, असे वादग्रस्त विधान केले होते. 10 जनपथ हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. हिमंता बिस्वा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत.