अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वडिलांचा धक्क्याने मृत्यू

17
फोटो - प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बलिया जिल्ह्यातील रेवती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलीस चौकीमध्ये तैनात असलेल्या शिपायाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली. अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडल्याची माहिती कळल्यावर धक्का बसलेल्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नागरिकांनी पोलीस शिपायाला पकडून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पोलिसाने जखमी अवस्थेत पळ काढला असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस शिपायाला निलंबित करून त्याला अटक केली आहे. आरक्षी असे या आरोपी पोलिसाचे नाव आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालनगर येथे एका दगडी ओट्यावर काही लोक झोपले असताना एका १५ वर्षांच्या मुलीसोबत पोलीस चौकीत अश्लिल चाळे सुरू असल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांनी पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडत बेदम मारहाण केली. मुलीवर बलात्कार झाल्याची घटना कळल्याने तिच्या ६० वर्षांच्या वडिलांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या संधीचा फायदा घेत आरोपी पोलीस पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र रेवती येथील कोतवाल कुवर प्रताप सिंह यांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या