बुलढाण्यात १ ते ४ डिसेंबर पोलीस विभागीय क्रीडा स्पर्धा; ७४० पोलीस खेळाडूंचा सहभाग

186

राजेश देशमाने । बुलढाणा

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा १ ते ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे संपन्न होत असून यामध्ये अमरावती परिक्षेत्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यातील ७४० पोलीस खेळाडू सहभागी होत आहे. अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी तथा या स्पर्धेचे माहिती अधिकारी रामेश्वर वेंजने यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.

पोलीस विभागामार्फत दरवर्षी क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. प्रथम जिल्हा पातळीवर व नंतर विभागीय पातळीवर या स्पर्धा होत असतात. यावर्षी अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील या स्पर्धा बुलढाणा येथे १ ते ४ डिसेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेत अमरावती शहर व अमरावती ग्रामीण, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम अशा सहा टिम सहभागी होत प्रत्येक जिल्ह्याचे १४५ या प्रमाणे ७४० खेळाडू सहभागी होत असून ७३ पंच म्हणून काम करणार आहे. या क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तीक असे दोन क्रीडा प्रकार असणार आहे.

सांघिक क्रीडा प्रकारामध्ये हॉलीबॉल, फुटबॉल, कब्बडी, खो-खो, हॉकी तर वैयक्तीक क्रीडा प्रकारात रनिंग, थाली फेक, गोळ फेक, भाला फेक, हॅमर थ्रो तर इन्डोरमध्ये कुस्ती, बॉक्सींग, ज्युडो हे प्रकार खेळविण्यात येणार आहे. हे सर्व क्रीडा सामने बुलढाण्यातील जिल्हा क्रीडा संकुल जिजामाता क्रीडा संकुल, पोलीस ग्राऊंड व सहकार विद्या मंदिराच्या मैदानावर होणार आहे. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन १ डिसेंबरला अमरावतीचे पोलीस उपमहानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांचे हस्ते होणार आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या संपूर्ण स्पर्धा यशस्वीतेसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर वेंजने, बी.बी. महामुनी, प्रदीप पाटील, गिरीष बोबडे, नलावडे, पोलीस उपअधिक्षक सातपुते हे विशेष परिश्रम घेत आहे. तर ४ डिसेंबर रोजी होणार्‍या समारोपीय कार्यक्रमाला अमरावती शहर आयुक्त संजय बावीस्कर, वाशिमच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अकोल्याचे अधिक्षक के. कलासागर, अमरावती ग्रामीणचे अधिक्षक जळके, यवतमाळचे अधिक्षक राजकुमार यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या