पोलीस-ढाल क्रिकेट, कर्नाटक स्पोर्टींग्जचा 3 विकेटस्नी विजय

ऐश्वर्य सुर्वेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर (5 विकेट आणि नाबाद 51 धावा) कर्नाटक स्पोर्टींग्जने पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धेत बॉम्बे जिमखान्यावर 3 विकेटने विजय मिळवत आपली विजयी दौड कायम राखली.

प्रथम फलंदाजी करणाऱया बॉम्बे जिमखाना संघाने 66 षटकांत सर्व बाद 229 अशी मजल मारली होती. त्यांच्या डावाला भूपेन लालवानी 86 ,सुजय ठक्कर 33 आणि ऋषिकेश जाधव नाबाद 38 यांनी आकार दिला.कर्नाटक स्पार्ंटग्जच्या ऐश्वर्य सुर्वेने 20 षटकांत 78 धाव देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने झुंझार फलंदाजीचे प्रदर्शन करीत नाबाद 51 धावांची खेळी केली. एकनाथ केरकरने 74 धावांची खेळी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यावर ऐश्वर्यने विजयाचा कळस चढवला.