पोलीस डायरी – पोलिसांनो ‘त्यांना’ ठोका!

2560

<<प्रभाकर पवार>>

चीनने पसरविलेल्या कोरोना या विषाणूंचा धसका साऱ्या विश्वाने घेतला आहे. कोरोना हा एक विषाणू आहे व कोव्हिड-19 हा त्या विषाणूने होणारा रोग आहे. या रोगामुळे 1 ते 2 टक्के लोक मरतात. त्यात वृद्धांचीच संख्या अधिक असते असे सांगण्यात येते. तरीही या कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली असून लोक भयभीत झाले आहेत. कोरोनाबाधीत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने साऱया सरकारी यंत्रणांवर ताण पडला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. डॉक्टरर्स व नर्स व इतर कर्मचारी वर्ग रात्रं-दिवस झटत आहेत. गर्दी हटविण्यासाठी पोलीस रस्त्यावर व रुग्णालयातही रुग्णांच्या मदतीसाठी तैनात आहेत. बंदोबस्तासाठी असलेला पोलीस शिपाई कैलास पंडितराव देसले (22) यास खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्ण म्हणून त्याला दाखल करण्यात आले आहे. पोलीस, डॉक्टर, नर्स आदी व अत्यावश्यक सेवेतील सरकारी अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करीत आहेत. त्यांना आमचा सलाम!

बहुसंख्य जनता आज घरी बसून आहे. परंतु पोलीस चोवीस तास काम करीत आहेत, तर मंत्रालयातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांची संख्या कार्यालयात कमी करण्यात आली आहे. आता फक्त 5 टक्केच कर्मचारी मंत्रालयात काम करीत आहेत, तर पोलीस कोरोनाबाधीत रुग्णांची सेवा करता करता रोज गुन्हय़ांचा तपासही करीत आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी गेल्या आठवडय़ात बऱयाच केसेस डिटेक्ट केल्या. गुन्हेगारी टोळय़ांना गजाआड केले. दोन दिवसांपूर्वी मुंबईत क्राइम ब्रँच यूनिट क्र. 9 चे वरि‰ पोलीस निरीक्षक महेश देसाई व त्यांच्या सहकाऱयांनी अत्यंत अप्रतिम कामगिरी केली. गोडाऊनमध्ये साठा केलेले सुमारे 15 कोटी रुपयांचे 25 लाख मास्क जप्त केले. हे मास्क काळय़ा बाजारात विकण्यास येणार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महेश देसाई व त्यांच्या सहकाऱयांचे या अफाट कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. अशी कारवाई पोलीस करीत असताना त्यांना कोरोनाबाधीत रुग्णांचा शोध घेण्याचेही काम देण्यात आले आहे. आता तर त्यांना परदेशातून आलेल्या व 14 दिवस घरातच राहण्याची सक्ती करण्यात आलेल्या नागरिकांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर शोध घेण्याचे काम देण्यात आलेले आहे. ण्ददहग्tा केलेले, तर काही हातावर शिक्का मारलेले बरेच जण घराबाहेर पडून फिरतात किंवा पळूनही जातात अशांच्या मागेही पोलिसांना लावण्यात आले आहे. त्यात रोज हॉटेल व लॉजिंगचीही तपासणी करण्याचे काम देण्यात आल्याने सारे पोलीस हवालदील झाले आहेत. मुंबई पोलीस तर जीवावर उदार होऊन देवावर भरोसा ठेवूनच काम करीत आहेत. बऱयाच पोलिसांकडे मास्कही नाही आहेत. तेव्हा पोलिसांना शिवीगाळ, मारहाण करणाऱया व अपशब्द वापरणाऱयांनी देश आणि जनसेवाही लक्षात ठेवावी आणि त्यांच्याशी चांगले वर्तन करावे. मॉल, थिएटर, हॉटेल व अत्यावश्यक सेवा वगळता आज सारेच बंद आहे. असा भयभीत काळ कधी कुणी पाहिला नव्हता. एड्स, एबोला, मारबर्ग, लासा, लेप्टोस्पायरोसिस, सार्स आदी रोगांनी यापूर्वी हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. पण कोरोनाने कधी नव्हे ते सारे विश्व हालवून सोडले आहे. तेव्हा भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही. परंतु येणाऱया मंदीने मात्र लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल. बेरोजगारीमुळे लोक स्वत:लाच संपवून घेतील. कोरोना नावाच्या अत्यंत सूक्ष्म जीवाणूने जगातील 750 कोटी जनतेमध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे. कोरोनाच्या धक्कानेच बऱयाच जणांचे जीव जात आहेत. मानवाला सळो की पळो करून सोडणाऱया वेगवेगळय़ा प्रजातींच्या विषाणूंनी यापूर्वी लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. सूक्ष्म जीवांच्या कोटय़वधी प्रजाती आहेत. त्यामुळे कधी ना कधी त्यांच्यातील सूक्ष जंतू माणसाला आयुष्यात उठवणार हे नक्की! कारण माणसासारखा बेशिस्त प्राणी कुठेही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली. सकाळी 7 ते सायं. 5 या वेळेत लोकांनी घराबाहेर न पडण्याचे व सायं. 5 वाजता टाळय़ा व घंटानाद करण्याचे आवाहन केले. ज्योतिष शानुसार या वेळेत राहू प्रभावी होता. विषाणूंसाठी तसा मारक होता. परंतु काही अतिउत्साहींनी कोरोनाचा नायनाट झाला असा समज करून घेऊन ते रस्त्यावर उतरले. घंटानाद केला, ढोलताशे बडवून मिरवणुका काढल्या. आता याला काय बोलावे? का नाही कोरोनाचा प्रसार होणार? आता ब्रिटिश असते किंवा चाफेकर बंधूंनी गोळय़ा घालून ठार मारलेला नराधम रँड असता तर त्याने काय केले असते? या देशात लोकशाहीचा बेशिस्त लोकांनी किती गैरफायदा घ्यावा? आजही लोक रस्त्यावर वाहने चालवून, गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशांना पोलिसांनी ठोकलेच पाहिजे.

या देशातील सूज्ञ, कायदा पाळणाऱया नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. यावर मनोविकार तज्ञ डॉ. आनंद कुलकर्णी प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हणतात, ‘कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. नियमन व नियोजन नीट न केल्यास धोका मात्र आहे. लोकांनी चिंता करू नये. जीवन हे कायम अनिश्चित आहे. ते कधीच निश्चित नसते. साथी येतात, जातात. भरती आल्यावर ओहोटीही असतेच. तेव्हा स्वत:ला असहाय्य वाटू देऊ नका. आपणास घरी बसायला सांगितले आहे त्याचा सद्पयोग करा, असेही डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. परंतु लोकं घरात कुठे बसत आहेत? बेशिस्त लोक घराबाहेर पडून इतरांनाही संकटात टाकत आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही. गुणाकाराचे आकडे वाढू नयेत इतकीच अपेक्षा! कोरोनापेक्षा पोलिसांना, डॉक्टरांना मारणाऱ्या प्रवृत्तींचा आज तमाम जनतेला धोका आहे. तेव्हा जनहो, कोरोनाऐवजी अशा लोकांपासून अधिक सावध रहा.

आपली प्रतिक्रिया द्या