मशीदीबाहेर भिक मागायची…नंतर आलीशान गाडीने घरी जायची….संपत्ती पाहून पोलिसही चक्रावले

प्रातिनिधीक फोटो

संयुक्त अरब आमीरातमध्ये भिक मागणे अपराध आहे. मात्र, या देशातच भिकाऱ्याची संपत्ती बघून पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मशीदीबाहेर भिक मागणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यावर तिची संपत्ती बघून तेही चक्रावले आहेत. या महिलेकडे आलीशान गाडी आणि मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. पोलिसांनी माहिलेवर कारवाई केली आहे.

ही महिला दररोज शहरातील मशीदीबीहेर भिक मागत होती. त्यानंतर काही अंतर चालत जात एका आलीशान गाडीने ती घरी जात होती. एका व्यक्तीला या महिलेचा संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता या महिलेचे खरे रुप उघड झाले आहे.

ही महिला शहरातील विविध मशीदीत दिवसभर भिक मागत होती. त्यानंतर शहराबाहेर काही अंतर चालत जात नंतर एका आलीशान गाडीने घरी जात होती. पोलिसांनी तिचा पाठलाग केल्यावर त्यांना ही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला असता त्यांना मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

संयुक्त अरब आमिरातमध्ये भिक मागणे हा अपराध असल्याचे आबुधाबी पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारांमुळे देशाची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे भिक मागण्यावर बंदी आहे. भिकारी समाजाला धोका देतात. लोकांच्या भलाईचा फायदा घेत ते पैसे उकळतात. शहरातील भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या महिलेवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.