इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर बेटिंग, भायखळा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाला बेडय़ा

20

सामना प्रतिनिधी । मुंबई

विश्वचषक स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर बेटिंग घेणार्‍या तिघा सट्टेबाजांना माटुंगा पोलिसांनी एका हॉटेलात रंगेहाथ पकडले. त्याच वेळी त्या सट्टेबाजांबरोबर भायखळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाट देखील सापडले. याप्रकरणी त्यांना  निलंबित करण्यात आले.

दादर पूर्वेकडील रामी गेस्ट लाइन हॉटेलच्या सातव्या मजल्यावर 706 क्रमांकाच्या खोलीत काही सट्टेबाज इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर बेटिंग घेत असल्याची खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली. त्यानुसार भोईटे यांनी त्यांच्या पथकासह त्या खोलीवर धडक दिली त्या वेळी तिथे मिकीन शहा (33), मनीष सिंग (32) आणि प्रकाश बनकर (32) हे तिघे क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेताना रंगेहाथ सापडले.

आपली प्रतिक्रिया द्या