आंघोळ करणाऱ्या महिलेचे चित्रीकरण करणाऱ्या पोलिसाला अटक

सामना ऑनलाईन,पुणे

एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बडीकॉपसारखे उपक्रम सुरू केलेत तर दुसरीकडे याच पोलीस दलाला शरमेने मान खाली घालायला लावणारा प्रकार घडला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने म्हटलं आहे की या पोलिसाने ती आंघोळ करत असताना गुपचूप चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. या पोलिसाला अटक करण्यात आली असून त्याचे ३ साथीदार फरार झाले आहेत

समीर पटेल असे अटक केलेल्याचे नाव असून त्याची नियुक्ती सध्या खडक पोलीस ठाण्यात आहे. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही महिला अंघोळ करत असताना पटेलने तिचे व्हिडिओ शूटींग सुरू केले. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. पटेलला जाब विचारला असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या पतीला दमदाटी केली. ज्यामुळे या महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली

आपली प्रतिक्रिया द्या