मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात डान्सबारवर छापा, २५ जणांना अटक

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये पोलिसांच्या आर्शिवादाने सुरू असलेल्या डान्सबारवर शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. परीमंडळ क्रमांक ५ चे डीसीपी सुहाच बावचे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एचबी टाऊनच्याजवळ ‘पायल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट’मध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर छापा मारला. यावेळी बारमध्ये २५ ग्राहकांच्या समोर ४ तरुणी अत्यंत मादक स्थितीत डान्स करताना आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी बारचा मालक, मॅनेजर आणि १५ ग्राहकांविरुद्ध कळमना पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला असून पायल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटचा मालक फरार असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटमधील पहिल्या मजल्यावर हॉलमध्ये गजल गायनाच्या नावाखाली बारबाला सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला. या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटचा मालक कमलेश नागपाल नामक व्यक्ती असल्याची माहिती आहे. त्याच्याकडून या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटच्या आतल्या हॉलमध्ये गेल्या काही दिवसांपासून डान्सबार सुरू होता. कळमना पोलिसांच्या कृपार्शिवादामुळे तो सुरू होता अशी माहिती आहे.

खामल्यातील पायल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटच्या आतमध्ये डान्सबार सुरू असल्याचे कळल्यानंतर परीमंडळ क्रमांक ५ चे डीसीपी सुहाच बावचे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा मारला. त्यावेळी बारमध्ये ४ तरूणी होत्या. त्यातील एक तरूणी गाण्यावर नाचत होती आणि इतर ३ ग्राहकांना मद्याचे पेले देत होत्या. ही तरूणी अश्लील नृत्य करीत असल्याचे आणि तोकड्या कपडयात भिभत्स हावभाव व अंगविच्छेप करून ग्राहकांशी अंगलट नृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले. छापा मारताच ग्राहकांमध्ये धावपळ उडाली, पण पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विपीन जितेंद्र लांडे (२७), देवेंद्र अशोक हटवार (३१), मुकेश सुरेश गावकर (४०), विशाल रमेश बढहोल (३९), धनराज चुरामन झोडापे (४०), नितीन प्रमोद वायलवार (४२), सैयद मुज्जफर अली (२८), शहजाद खान महबुब खान (४०), करण हरीदास रामटेके (२६), तानाजी रामचंद्र मोटे (५३), प्रतिक ताराचंद केसरवानी (२८), संदीप मुलचंद गुप्ता (३२), प्रकाश लिलाधर पाटोले (५२), कपील किशन पुनीयानी (२९), रोशन महादेव मेहर (३०), विनोंद दत्तुजी इंगळे (४२), नंदकिशोर प्रेमचंद चकोले (२५), सागर निलचंद खोड (४१), पारस शामराव वाहने (४२), अमोल यादवराव मोहोड (३७), हेमेंद्र टेकचंद्र रहांगडाले (३०), अविनाश मोरेश्वर हिंगणेकर (३८), धिरज भगवतराव शिंगारे (२८), महेश बलराम सचदेव (५८) बार मॅनेजर, व बार मालक कमलेश हरीचंद नागपाल (५८), रा. नागपूर यांचा समावेश आहे.

या प्रकरणी आरोपींविरूध्द कळमना पोलीस ठाण्यात कलम २९४,१०९,११४,३४ भादंवि सहकलम ३,८,(१,२,३,४,५) महाराष्ट्र हॉटेल व उपहार गृहे आणि मध्यपान कक्ष (बार रूम) मधील अश्लील नृत्यांना प्रतीबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना गुन्हयात अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या